धुळगाव येथे वर्षवास सांगता

0

येवला : येवला तालुक्यातील धुळगाव भीमनगर येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या ८८ दिवसाचा कालावधीत बौद्ध धर्माचा नितीमुल्यानुसर वर्शवास पाळला जातो त्याची सांगता मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका सफेद रंगाची वस्र घालून मंगलमैत्री वातावरणात भारतीय बौद्ध महासभे चा मार्गदर्शनाखाली मुक्तिभूनी येथे ४ ऑक्टोबर ते १३ऑक्टोबर या कालावधी बसलेल्या भंते सुमेधबोधी यांचा भिक्कु संघाचे स्वागत महिलांनी फुला पुष्पाची उधळण करत केले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दिपकजी गरुड, वंचीतचे तालुका अध्यक्ष संजय पगारे,साहेबराव भालेराव,पोपट गायकवाड,यांनी महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन करून वंचित महिला आघाडीचा संजीवनी गायकवाड, उज्ज्वला गायकवाड, वाल्हूबाई जगताप यांचा हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले,यावेळी भंते यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील उपस्थित उपासक यांच्याकडून ग्रहण करून बुद्ध पूजा पाठ करण्यात आली त्यानंतर वंचित चे संजय पगारे, साहेबराव भालेराव,दीपकजी गरुड तसेच महिला आघाडीचा संजीवनी गायकवाड,शीतल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले
बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करत असताना त्याचे काटेकोर पालन करत नीतिमूल्ये जोपसल्यास तसेच बौद्ध धम्मात अंधश्रद्धेला व कर्मकांडाला थारा न देता, तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला विज्ञानवादी विचार सरणी अंगिकरल्यास जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे भंते यांनी धम्मदेसणा. देतानी उपासकांना सांगितले यावेळी सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर आभार सम्राट गायकवाड यांनी मानले यावेळी संजय पगारे, साहेबराव भालेराव,विनोद त्रिभुवन,वसंत घोडेराव, हरी आहिरे बाबा,प्रभाकर गरुड,बाळासाहेब गायकवाड,पोलिस पाटील दिलीप गायकवाड, उपसरपंच शशिकांत जगताप, संजय गायकवाड,राजेंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष.गायकवाड,विनेश गायकवाड, यांच्यासह संजीवनी गायकवाड, उज्ज्वला गायकवाड,सुनीता गायकवाड,प्रतिभा गायकवाड,सपना गायकवाड,कल्पना गायकवाड,रुचिता गायकवाड, करुणा गायकवाड , भारती गायकवाड,सरला गायकवाडआदी याप्रसंगी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here