
नांदगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणा दिनाचा 87 वा वर्धापन* दिन नांदगाव येथील आंबेडकर नगर मध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन व मिठाई वाटप करण्यात आली. नांदगाव तालुक्याचे लाडके आमदार सुहास आण्णा कांदे, सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाने व आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिल भाऊ तेलुरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अविनाश पवार, शाखाप्रमुख विनोद अहिरे, उपशाखाप्रमुख गणेश पवार, सुनील कापडणे इत्यादी कार्यकर्ते यांनी नियोजन केले.
