मनपा शाळा क्र.७१ मध्ये विज्ञान जत्रा उपक्रम उत्साहात संपन्न

0

नाशिक : 🩻🧲🔮🩻🧲⚗️🧲🔭🔬
सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये “विज्ञान जत्रा” उपक्रम उत्साहात संपन्न झाला. उपक्रमाचे आयोजन अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या  माध्यमातून करण्यात आले. विज्ञान जत्रेचे उद्घाटन प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते फित कापून व सरस्वतीपूजन करुन करण्यात आले. विज्ञान जत्रेत इ.६ वी च्या गौरी अहिवळे, सिध्दिका देसाई, वैष्णवी गायकवाड, देवयानी पाटिल, यश घोडे, खुशाल जगताप, गौरी कासार, दिक्षा कुशारे, इ.७ वी च्या पूनम चव्हाण, प्रियंका केंदळे, लावण्या गायकवाड, शालोम कोल्लूर, सपना भदरगे, रुद्र शिंदे, हेमराज राठोड, इ.८ वी च्या साहिल हिंगे, खुशी गांगुर्डे, गायत्री पाटिल, समीक्षा डोके, कृष्णाली साळुंके, पूनम ईशी, गौरी काकडे* या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन दिवसरात्र, ऋतू, मानवी शरीररचना, एक वस्तू अकरा प्रतिमा, गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, धृव जोडिचे दोलक, प्लाझमा बाॅल पदार्थाची चौथी अवस्था, बाजूचे स्थलांतर, न्यूटन तबकडी, स्वतः चे बुबुळ पाहणे, अनूनिनाद, प्रकाशाचा मार्ग, पृथ्वीचा आकार, दृष्टिसातत्य, डिप वेल, होल इन हॅंड, जडत्व, परिदर्शी, शोभादर्शक यंत्र इ. प्रतिकृतींची व प्रयोगांची माहिती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिली. या *विद्यार्थ्यांना अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्नेहा नगरकर व दिक्षा महाजन यांनी मार्गदर्शन केले.विज्ञान जत्रेचा शाळेतील इ.१ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी टप्याटप्याने आनंद घेत विविध प्रयोगांतील वैज्ञानिक नियम, तत्वे जाणून घेतली. उत्तरार्धात बोलताना प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी या विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनने एक स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तद्नंतर सहभागी *विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. शेवटी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन विज्ञान जत्रेचा समारोप करण्यात आला.विज्ञान जत्रा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रीमंडळ तसेच किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला पवार, शोभा मगर, रुपाली ठोक, कविता खैरे, सुनिता धांडे, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, किर्तीमाला भोळे, वर्षा सुंठवाल, प्रविण गायकवाड यांनी सहकार्य केले.
🔭⚗️🔬⚗️🔭⚗️🔬⚗️🔭⚗️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here