
सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमिरे) सिल्लोड प्रतिनिधी- सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील गोळेगावच्या बसस्थानकावरुन गावात प्रवेश करताना समोरच असलेले श्री तारादेवीचे भव्य नवीन बांधकाम केलेले मंदिराचे दर्शन होते.भक्ताची श्रध्दा दृढ असेल तर तारादेवी भक्तांच्या सतत पाठीशी उभी असते. याच विश्वासाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन भक्त गोळेगाव येथील तारादेवीच्या दर्शनास येतात.
नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परीसरास यात्रेचे स्वरूप येते.भक्तांच्या हाकेला साद देणे हा मातेचा स्वभाव असल्याणे अणेक भक्त मातेच्या दर्शनासाठी व नवस मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी गोळेगावच्या तारादेवीच्या मंदिरात येतात. भक्तांरे संकट हरण्यासाठी देवी सतत कार्यशील असते. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर हे मंदिर आहे.मंदिराचे बांधकाम भक्तांना आकर्शीत करेल असे आहे. मंदिरासमोर भव्य असे मनोरे असुन त्या दोन मनोर्यांवर भक्तगण नीवांतपणे आसरा घेतात.या मंदिरासमोर श्री गजानन महाराजांचे सुद्धा आकर्शक व भव्य असे मंदिर आहे. नवरात्रोत्सवादरम्यान तारादेवी मंदिर कमीटी व गावकर्यांकडुन मंदीर परीसरात वीवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन त्यामध्ये किर्तण, भजण, सांस्कृतिक कार्यक्रम व दाडीया असे विविध कार्यक्रम नऊ दीवस चालतात.परीसरातील भक्तगण सुद्धा या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. शेवटच्या दीवशी बसवलेल्या देवीची वाजत गाजत मीरवणुक काढुण वीसर्जण करण्यात येते.
