डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर परिषद 2022 ला केले संबोधित

0

नवी दिल्ली  : “कुटुंब नियोजनाचे महत्त्व जाणत भारताने 1952 च्या सुरुवातीला राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला*भारताला कुटुंब नियोजनाचे महत्त्व फार लवकर समजले आणि 1952 मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा तो पहिला देश ठरला.” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर परिषद, 2022 मध्ये बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सांगड घालत, “शाश्वत प्रयत्न, संचालनात्मक भागीदारी, कुटुंब नियोजनातील पुढच्या टप्याला आकार देणे ” ही या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, “भारतातील 31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी 2.1 किंवा त्याहून कमी प्रजनन दर गाठून प्रतिस्थापन पातळी प्रजनन क्षमता गाठली आहे आणि आधुनिक गर्भनिरोधकांच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तो 56.5% झाला आहे. (NFHS 5) मिशन परिवार विकास (MPV) 2016 ने राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाला आणखी गती दिली आहे असे डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले. या योजनेंतर्गत, ‘नई पेहेल’ किटचे वितरण, ‘सास बहू संमेलन’ आणि सारथी व्हॅन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचून कुटुंब नियोजन, निरोगी बालक जन्म अंतर आणि लहान कुटुंबांचे महत्त्व याबाबतीत संवाद साधण्यास मदत होत आहे. या उपक्रमाच्या प्रारंभापासून आजवर 17 लाखांहून अधिक “नवविवाहित जोडप्यांना नई पेहेल किटचे वाटप करण्यात आले आहे, 7 लाखांहून अधिक सास बहू संमेलने आयोजित केली गेली आहेत आणि सारथी व्हॅनद्वारे 32 लाखांहून अधिक जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (NFHS-5) आधुनिक गर्भनिरोधक वापरामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली तसेच आणि मिशन परिवार विकास (MPV) अंतर्गत सर्व राज्यांमध्ये गर्भनिरोधकांचा तुटवडा कमी झाला आहे,” असे त्या म्हणाल्या.2012 आणि 2020 दरम्यान, भारताने 1.5 कोटी अतिरिक्त आधुनिक गर्भनिरोधक वापरकर्ते जोडले ज्यामुळे आधुनिक गर्भनिरोधक वापरात लक्षणीय वाढ झाली आहे” असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमादरम्यान, मंत्री महोदयांनी भारतीय कुटुंब नियोजन – 2030 व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले तसेच वैद्यकीय पात्रता निकष (MEC) व्हील ऍप्लिकेशन, कुटुंब नियोजनाच्या आपूर्ति साखळी प्रबंधनाचे ई-मॉड्यूल (FPLMIS) आणि डिजिटल इंटरव्हेंशन श्रेणी अंतर्गत डिजिटल आर्काइव्ह ऑन फॅमिली प्लॅनिंग लॉन्च केले.डॉ. पवार यांनी तळागाळातील आरोग्य सेवा प्रदात्यांना ‘ स्वतःला झोकून काम करणारे हे लोक, ज्यांचे अथक प्रयत्न या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचे आहेत’ असे म्हणत त्यांचे कौतुक केले. यावेळी पवार यांच्या हस्ते पुरुष सहभाग, दोन मुलांच्या जन्मामधल्या अंतराच्या पद्धती, स्वतःची काळजी घेण्याच्या पद्धती, महिलांच्या प्रसुतीनंतर वापरण्यात येणारे गर्भनिरोधक (PPIUCD) आणि इंजेक्शन द्वारा देण्यात येणारे गर्भनिरोधक (MPA) या श्रेणींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांचा सत्कार करण्यात आला.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाला आता सात दशकांहून अधिक काळ झाला आहे आणि या काळात, भारताने लोकसंख्या नियंत्रणाच्या संकल्पनेपासून लोकसंख्या स्थिरीकरण आणि सातत्यपूर्ण काळजीची सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी अंतर्भूत केलेल्या उपाययोजनामध्ये एक आदर्श बदल पाहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here