गरजू विद्यार्थांना शालेय पुस्तके वितरण आणि नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न

0

मनमाड – रोटरी क्लब मनमाड च्या वतिने गरजू विद्यार्थ्यांना सहावी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले,एकूण 25 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला.तसेच डोळ्यांच्या तपासणीसाठी रोटरी नेत्र रुग्णालयाच्या नवीन व्हॅनच्या मदतीने
75 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांना चश्मा लाग़ल्याचे निदान झाले आणि 1 विद्यार्थ्याला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात बोलावण्यात आले.प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, लौकुमार माने, जेष्ठ रोटरीयन गुरजीत कांत, सुभाष गुज़राथी सर, अनिल दादा काकड़े, आनंद काकडे, देवराम सदगिर, क़ौशल शर्मा, सागर चव्हाण आदि. उपस्थित होते.रोटरी महिला क्लब तर्फे आयोजन करन्यात आले.
तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार 🙏🏻
Let’s Imagine Rotary.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here