
मनमाड : कारगिल दिनानिम्मित सैनिक़ टाकळी, कोल्हापुर येथिल काही जवान अमरनाथ यात्रेहुन परतत असल्याची बातमी रोटरीक्लब परिवार यांना आल्याचे समजले असता, रोटरी क्लब मनमाड तर्फे कारगिल दिनाचे औचित्यसाधुन मनमाड रेल्वे स्थानक येथे सर्वांचे स्वागत करण्यात आले. कारगिल शहिद जवानाना श्रद्धांजली वाहन्यात आली. सैनिकानी भारत माता की जय चे नारे लावण्यात आले.सैनिक़ टाकळी कोल्हापुर हया गावाने १५०० शेहुन आधिक सैनिक़ देशसेवेसाठी दिले आहेत. १८ शहीद असतानाही गावातून शेकड़ो मुले सैन्यभरती साठी जात असतात. सदयस्थितीत गावातील ४५० हुन आधिक भारतीय सैन्यदलात, नौदलात कर्तव्य बजावत आहेत. पाचाव्या पीढि पर्यंत सेवा देन्याची परंपरा गावाला लाभाली आहे.या प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, जेष्ठ रोटरीयन गुरजीत कांत, आनंद काकडे. आदि उपस्थित होते. सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा तर्फे भोजन व पाण्याचे पार्सल देण्याची व्यवस्था करण्यात आली.
