मनपा शाळा क्र. ७१ मध्ये शालेय मंत्रीमंडळ निवडणूक व शपथविधी कार्यक्रम संपन्न

0

नाशिक: हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र ७१ मध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक व शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. भारतीय लोकशाही अधिक सक्षम व्हावी, विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे, मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष माहित व्हावी म्हणून शालेय मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी सांगितले. यात विद्यार्थ्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, पॅनल निर्मिती करणे,वर्गवार प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान घेणे, मतमोजणी करणे, निकाल जाहीर करणे, मंत्रीमंडळ स्थापन करणे, खातेवाटप करणे, शपथविधी इ. निवडणुकीशी संबंधीत सर्व प्रक्रिया राबविण्यात आल्या. प्रगती, विकास व गुणवत्ता पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली.निवडणूकीसाठी खास मतपत्रिकांची छपाई करण्यात आली. शाळेतील इ १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीच्या खालील उमेदवारांना निवडून दिले.
पंतप्रधान – साहिल हिंगे, उपपंतप्रधान – यश घोडे, शिक्षणमंत्री- खुशी गांगुर्डे, उपशिक्षणमंत्री – शालोम कोल्लूर, क्रीडामंत्री – रसिका तांगडे, उपक्रीडामंत्री – आदित्य ढाले, कला व सांस्कृतिक मंत्री- रुद्र शिंदे, कला व सांस्कृतिक उपमंत्री – पूजा ढाले, ऊर्जा व संवर्धन मंत्री – वैभव वाडेकर, स्वच्छता व आरोग्यमंत्री – ऋषिकेश साळुंखे, स्वच्छता व आरोग्य उपमंत्री – कल्याणी राठोड, परिपाठमंत्री -खुशाल जगताप, माहिती व तंत्रज्ञान मंत्री -प्रियंका केंधळे, सहल मंत्री – गौरी कासार, अन्न व पर्यावरण मंत्री – कुबेरी वानखेडकर यांची निवड करण्यात आली.निवडून आलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळाला खास शैक्षणिक शपथ देऊन शिक्षिका रुपाली ठोक यांनी शपथविधी सोहळा संपन्न केला.सर्व शालेय मंत्रीमंडळाचा मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते पदाची रिबन व बॅज देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मानाचा शैक्षणिक राजदंड शालेय मंत्रीमंडळाच्या स्वाधीन करण्यात आला. तद्नंतर विजयी उमेदवारांना विद्यार्थ्यांनी उचलून घेत, नाचून आपला आनंदोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रुपाली ठोक , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून किसन काळे, विनोद मेणे यांनी तर झोनल अधिकारी म्हणून प्रमिला पवार यांनी काम बघितले .मतदान केंद्राध्यक्ष म्हणून समीक्षा डोके, कृष्णाली साळुंखे, मतदान अधिकारी म्हणून अश्विनी घुमरे, महिमा वाघ, तनुजा काळे, पूनम चव्हाण, ऋतुजा गाडेकर, प्रतिभा वाकळे, लावण्या गायकवाड, प्राजक्ता काळकर या विद्यार्थ्यांनी काम बघितले. तर शोभा मगर, कविता वडघुले, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, योगिता खैरे, प्रविण गायकवाड या शिक्षकांनी निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here