रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाण्याची ३६८ वी “रहाडयात्रा”हनुमान टाकळी येथे संपन्न

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील मारूती मंदिरा समोर विस्तवावर चालत जाण्याची ३६८वी रहाडयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.समर्थ रामदास स्वामी यांनी रंगपंचमी शके १५७६ म्हणजे इ.स.१६५४ साली गाईच्या शेणापासून या गोमयीन(प्रताप मारुतीची स्थापन केली आहे. पहिला हनुमान जन्मोत्सव सोहळा चैत्र पौर्णिमा शके १५७७ म्हणजे इ.स.न.१६५५ साली सुरु झाला. पहीली रहाडयात्रा आषाढ क्रुष्ण १४ शके १५७७ म्हणजे इ.स.न.१६५५ साली सुरू करण्यात आली हा उल्लेख पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील दिनकर स्वामी मठाचे मठाधिपती प्रकाशबुवा रामदासी लिखित दिनकर स्वामींच्या चरित्र ग्रंथात आढळतो. हे हनुमानजी नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आणि अनुभव आहे. हनुमानजी भाविकांच्या नवसाला पावल्या नंतर नवसपुर्ती करण्यासाठी रखरखीत लालबुंद विस्तवावर अनवाणी पायाने चालत जाउन भाविक नवसपुर्ती करतात परंतू भाविकांच्या पायाला कसलीही ईजा होत नाही हे या यात्रेचे खास आकर्षण वैशिष्ट्य आहे.या रखरखीत विस्तवावरून चालत जाण्याचा पहिला मान बाबासाहेब मारुती लोखंडे राहणार- पाण्याचे धामणगाव ता. आष्टी जिल्हा बीड यांना आहे.मग ईतर भाविक जातात. प्रथम समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प.पू.रमेश अप्पा महाराज सचिव सुभाष बर्डे,साताऱ्याचे तहसीलदार किशोर बरबडे,ओम अवधूत, सुरेंद्र बर्डे,बंडू दळवी,अण्णा दगडखैर, शाम भालेराव यांच्या हस्ते रहाडीची विधीवत पुजा करण्यात आली. पंचारती नंतर” बजरंग बली की जय”या नामोच्चरात ही रहाड पेटवन्यात आली. लालबुंद विस्तव झाल्या नंतर अबाल, व्रुद्ध, महिला, बालके, युवक, युवती यांनी विस्तवावर चालत जाउन आपली नवसपुर्ती पुर्ण केली.मुंबईचे पोलीस निरीक्षक बबनराव दगडखैर आणि पोलीस हेड काँ. सुभाष दगडखैर यांच्या वतीने यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वसंत राव डमाळ,सोपान गायकवाड यांनी निधी जमा करण्याचे काम केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बर्डे,निलेश काजळे,शिरसाट गुरुजी, ग्रामसेवक फुंदे,आणि भाविक ग्रामस्थ यांनी विषेश परिश्रम घेतले.यात्रेनिमित्त सर्व रस्ते हाउसफुल्ल झाल्यामुळे सर्वत्र ट्राफिक जाम झाली होती. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here