आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्‍ट्राचे नवनियुक्‍त उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्‍यावर भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी बांबु पासून तयार करण्‍यात आलेल्‍या तिरंगा ध्‍वज भेट देत आ. मुनगंटीवार यांनी त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.राज्‍यसभेची महाराष्‍ट्रातील निवडणूक असो वा महाराष्‍ट्र विधान परिषदेची निवडणूक, अतिशय नियोजनबध्‍द पध्‍दतीने भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना विजयी करण्‍यात आपला सिंहाचा वाटा आहे. मुख्‍यमंत्री पदाच्‍या कार्यकाळात आपण घेतलेले विविध लोकहिताचे निर्णय व त्‍या माध्‍यमातुन भारतीय जनता पार्टीची जनमानसात ओजस्‍वी झालेली प्रतिमा हे आपल्‍या कुशल नेतृत्‍वाचे द्योतक आहे. महाविकास आघाडीच्‍या भ्रष्‍ट व निष्‍क्रीय कारभाराला कंटाळलेल्‍या महाराष्‍ट्रातील जनतेला नव्‍या सरकारच्‍या माध्‍यमातुन मोठा दिलासा मिळाला आहे. नव्‍या सरकारच्‍या माध्‍यमातुन महाराष्‍ट्र विकासाच्‍या मार्गावर अग्रेस होत पुन्‍हा एकदा भरारी घेईल व सर्वसामान्‍य जनतेच्‍या कल्‍याणाचा मार्ग सुकर आणि सुलभ होईल अशा शुभेच्‍छा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्‍या,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here