मनमाड : मनमाड येथील शासकीय विश्रामगृह येथे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रितेश राठौड, राष्ट्रीय महासचिव अभिषेक कुशवाह, राष्ट्रीय विधी सचिव सुनेत्रा राजपूत प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली,भारतीय संविधान आणि मानवी हक्कांचे रक्षण करणे , भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन, महिला अत्याचार , गरीब, वंचित,अनाथ,अपंग, अन्यायग्रस्त जनतेला न्याय देऊन संविधान आणि कायद्याच्या कक्षेत प्रशासनासोबत काम करणे आहे. तसेच सुसंस्कृत लोककल्याणकारी योजनांची माहिती परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याच बरोबर चांगले चारित्र्य आणि समाजहिताची जाणीव असलेल्या लोकांना संस्थेचे सदस्य बनवावे . आपण आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडाल अशी आम्हास खात्री आहे
.असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे,यावेळी प्रकाश पगारे, दिव्यांग सुरेश गांगुर्डे,सारीका पगारे, संगिता सांगळे आदी उपस्थित होते.अशी माहिती हिरामण मनोहर यांनी दिली.
Home Breaking News पत्रकार सतिष परदेशी यांची भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद राष्ट्रीय संघटन सचिव...