चाळीसगाव/ प्रतिनिधी
शहरातील नगरसेवक आन्ना कोळी तसेच मा.नगरसेवक,रमेश चव्हाण यांच्या पुत्रांमध्ये परत वाद होऊन,चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे कि,मा.नगरसेवक रमेश विक्रम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नगरसेवक आन्ना चिंधा कोळी,त्यांचे पुत्र सिद्धार्थ कोळी व सौरभ कोळी,वसंत कोळी,राहुल कोळी,अक्षय कुमावत,लखन कुमावत,वैभव रोकडे यांनी रामवाडी येथील रमेश चव्हाण यांच्या घरासमोर काल दुपारी 2ः30 वाजता गैरकायद्याची मंडळी जमवुन दगडफेक व शिवीगाळ केली व तलवार मिरवुन दहशत निर्माण करुन दमबाजी केली,म्हणुन चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कलम 143,144,147,148,149,294,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन,वरिल संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे असे तपासाधिकारी सहायक पोलिस निरिक्षक आशिष रोही यांनी सांगितले.
दुसर्या गटातील नगरसेवक आन्ना कोळी यांची मुलगी जयश्री कैलास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे कि,घाटरोड वरिल कोळी महासंघाच्या कार्यालयात येऊन काल दुपारी 1ः30 वाजता रमेश विक्रम चव्हाण, मोहन रमेश चव्हाण,पवन रमेश चव्हाण,रोहन रमेश चव्हाण यांच्यासह इतर 4/5 जण यांनी शटर तोडुन अनधिकृत प्रवेश करुन,शटर ,टेबल,खुर्च्या व इतर सामानाची मोडतोड करुन,तेथील महर्षी वाल्मिक ऋषींचा फोटो फेकुन धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला अनुसूचित जाती कलम 3(1),143,144,147,148,149,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास डी.वाय.एस.पी.कैलास गावडे हे करित आहेत.
सदर दुसर्या गटातील रमेश चव्हाण हे खाजगी दवाखान्यात उपचार घेत असुन त्यांचे पुत्र व इतर संशयित फरार आहेत,पोलिस त्यांचा कसुन शोध घेत आहेत,असे तपासाधिकारी डीवायएसपी कैलास गावडे यांनी दैनिक पुण्यप्रतापशी बोलतांना सांगितले.