शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारीस अडथळा होणाऱ्या वाहनाच्या अतिक्रमनाचा बंदोबस्त करा

0

मनमाड 🙁  प्रतिनिधी निलेश व्यवहारे ) शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारीस अडथळा होणाऱ्या वाहनाच्या अतिक्रमनाचा बंदोबस्त करने बाबत  मनमाड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सद्यपरिस्थितीत प्रमुख रस्त्यावरील वाहने उभे आडवे उभे करून सदरील अडथळा निर्माण होत असतो . त्यामुळे अनेक वेळा तासतास वाहतूक खोळवते . तसेच वाद निर्माण होऊन अनेक वेळा हाणामान्या होतात . त्यामुळे कायदासुव्यव्स्थेचा प्रश्नही निर्माण होतो तसेच व्यापान्याच्या मालाच्या मोठ्या ट्रकही दिवसभर रस्त्यावर उभे राहून माल खाली करत असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो . वास्तविक व्यापारांच्या जड वाहनांना माल खाली करण्यास यापूर्वीच रात्रीची वेळ दिलेली असताना त्याचे पालन होत नाही . प्रामुख्याने स्टेशन परिसरात सकाळ संध्याकाळच्या वेळात रस्त्यावर टॅक्सी , मॅजिक पार्किंग ठेवण्यात येतात त्यामुळे कायमच वाहतूक खोळवली असते . याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत . हा शहराचा प्रमुख रस्ता असल्याकारणाने अम्ब्युलस , तसेच अग्निशामक गाडीही अडकून पडल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत . परंतु याचे घेणेदेणे ह्या टॅक्सी धारकाना नसते तसेच मालेगाव येथील टॅक्सी चालक रात्री च्या वेळेस गाड्या आडव्या उभ्या लाऊन जास्त भाड़े आकारून अरेरावीही करतात . परिसरात लॉजेसही आहेत . व त्यांचे वाहनेही रोडवरच पार्क असतात . या सर्व बाबीमुळे शहरातील जनता व्यस्त झालेली असून आता त्याच्या तक्रारी आमदाराच्या शिवसेना कार्यालयात ही येत आहेत . या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण त्वरीत यावर कार्यवाही करून जनतेची या त्रासातून सोडवणूक करावी . ही विनंती . प्रत रवाना १ ) आ . सुहास अण्णा कांदे सो . नांदगाव विधानसभा मतदार संघ , २ ) मा . डी . वाय . एस . पी . सो . मनमाड विभागीय कार्यालय मनमाड , ३ ) मा . मुख्याधिकारी सो . मनमाड नगर यांना निवेदनाची प्रत देण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here