तब्बल 24 वर्षानतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

0

दरेगाव- ( प्रतिनिधी-  गोरक्षनाथ लाड ) चांदवड तालुक्यातील निमोण येथील जनता विघालय निमोण सन- १९९७ – ९८ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून चौवीस वर्षांनंतर एकत्र येत आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत निमोण जनता विघालयात येथे मोठया उत्साहात स्नेह मेळावा पार पडला.कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती मातेचे पुजन दीपप्रज्वलन पुजन माजी शिक्षक अशोक पाटील सर,न्याहारकर सर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक अशोक पाटील होते.
सर्व विद्यार्थी एकत्र आल्यावर चोवीस वर्षानंतर या बॅचच्या विद्यार्थीविद्यार्थिनींनी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देत कोण कुठे आहे, काय करतात, आई वडील कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली.सर्वांनी आपला परिचय देत,शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला.शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा सांस्कृतिक कार्यक्रम सहलीची धूम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थीनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.सोशल मिडीयाच्या माध्यमातून शाळेचे माजी विद्यार्थी मातोश्री क्लिनिकचे संचालक डाॅ.भाऊराव देवरे,HAL येथे कार्यरत असलेले बाळासाहेब पिपळे,गणपत आहेर(सर) आदीसह व्हाॅटस्प ग्रुप मागील सन २०२० मध्ये तयार केला.त्या शाळेतील विद्यार्थीनी जोडल्या गेल्या परंतु कोरोना मुळे स्नेह मेळाव्याचे आयोजन करता येत नव्हते.ग्रुप मधील भगवान गोसावी,डाॅ.देवनाथ पवार,चंद्रभान उगले,राजेंद्र लाड,सुनिल गवारे,यांनी स्नेह मेळावा घेण्याची ग्रुप मध्ये सुचना मांडली.या मेळाव्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थ्यीनीनी प्रतिसाद देत सर्वांनी स्नेह मेळावा व स्नेहभोजन आयोजन करण्याचे ठरविले. या स्नेह मेळाव्यात पुणे,कल्याण,नाशिक,मनमाड,चांदवड,या परिसरातून विद्यार्थी जनता विघालयात दाखल झाले होते.शाळेतील माजी विद्यार्थी आज राजकारण,शिक्षक,डाॅक्टर,शेतकरी,औद्योगिक सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी त्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत.अशी भावना मालती शिंदे,सुनिता शेळके,प्रमिला देवरे,मीना गांगुर्डे,सुनिता कडनोर,गणपत आहेर,देविदास शेळके,बाबाजी पगार,डाॅ.भाऊराव देवरे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वानुमते आपल्या शाळेप्रति आपल देण लागत या नात्याने सर्व विद्यार्थी कडून यथाशक्ती वर्गणी गोळा करून १लाख रूपये शाळेच्या नावाने F-D करून व्याजापोटी येणारी रक्कम शाळेत १०वी (दहावीत) येणार्या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपी द्यावी असा निर्धार करण्यात आला.ती रक्कम दिवाळी पर्यंत जमा करून देऊ असे ठरले.माजी मुख्याध्यापक अशोक पाटिल व सद्या काजी सांगली येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक न्याहारकर यानी मार्गदर्शन केले.याप्रसंगी बोलताना पूर्वीचा विद्यार्थी आणि आताचा विद्यार्थी यांची तुलना करून मागिल दिवस छान होते.अशी आठवण करून दिली.तसेच आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा असे कार्यक्रमाच्या प्रसगी बोलत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमिला देवरे यांनी केले .
यावेळी अनिल सोनवणे,नागेश आहेर,विलास देवरे,नवनाथ पवार,सुजित भवर,सजय आहिरे,दिपक देवरे, शिवाजी आहिरे,गोरक सोनवणे,सदिप देवरे,कैलास देवरे,अनिल सोनवणे आदिसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.कार्यक्रम आटोपल्यानंतर आंब्याचा रस,पुरण पोळी (माडे) आमटी – भात भजी +कुरडाई आणि गावरान तूपाचा आस्वाद घेत सगळ्यांनी मनसोक्त स्नेहभोजन केले. जेवनासाठी डाॅ. स्वाती देवरे,विद्या लाड,सुनिता देवरे,निर्मला पिपळे,तारा गवारे यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here