मिरचीला यंदा तरी भाव मिळेल का शेतकर्‍यांना आशा

0

सिल्लोड प्रतिनिधी:-( विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील सलग तिन वर्षांपासून विहिरींना मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी निर्यातक्षम मिरची लागवडीला प्राधान्य दिले आहे यावर्षी शेती मशागत, मजुरी, रोप, मल्चिंग पेपरचे भाव वाढल्याने मिरची लागवडीचा खर्च चांगलाच वाढला आहे खर्च वाढला असला तरी मिरचीला भाव मिळेल का ? या प्रश्नाने शेतकऱ्यांना सतावले आहे.तालुक्यात गेल्या वर्षी ४ हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला २०- २५ रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला त्यानंतर मात्र आवक वाढल्याने भाव कमी होऊन ८- १० रुपयांवर आले भाव कमी झाल्याने तोडनी व वाहतूक खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही यामुळे मिरची रस्त्यावर फेकन्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती पिरोळा फाट्यावरील मिरची खरेदी केंद्रांवर तर व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याने संतप्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता.मका व कापूस ही दोन पिके तालुक्यात प्रामुख्याने घेतली जातात मात्र खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी मिरची, आद्रक, हळद अशा मसाले पिकांकडे वळत आहे. गेल्या वर्षी मिरची रस्त्यावर फेकन्याची वेळ आली, तर यंदा आद्रकला हजार- बाराशेच्या वर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या घामाचा दाम देखील पदरी पडला नाही. तालुक्यात यंदाही वरुण राजाच्या मेहेरबानीमुळे उन्हाळ्यातही विहिरींना मुबलक पाणी आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करीत आहे. तालुक्यात आतापर्यंत ४०० हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे. शेती मशागत, मजुरी, रोप, मल्चिंग पेपरसह कीटकनाशक, रासायनिक खतांचे भाव वाढल्याने यंदा मिरची लागवडीचा खर्च वाढला आहे आता उत्पन्न पदरी पडताना भाव मिळाला, अशी अपेक्षा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आहे.परदेशात निर्यात तरी ही केळगाव परीसरातील शेतकरी आमठाणा, येथे मिरची खरेदी केली जाते मिरची बाजारात आली की, आमठाणा येथे तालुक्यातील व परराज्यातील व्यापारी येथे ठाण मांडून बसतात. येथून गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेशसह बांग्लादेशात मिरची निर्यात केली जाते. मात्र आवक वाढल्याचे निमित्त करीत व्यापारी कमी भावाने खरेदी करुण मिरची उत्पादक शेतकऱ्यांची लूट करतात. विशेष म्हणजे यातून दररोज तालुक्यात लाखोंची उलाढाल होते. मात्र यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने व्यापारी मनमानी करतात.मिरची रोपमध्ये फसवणूक उन्हाळी मिरची लागवडीसाठी अनेक रोपवाटिकांमध्ये मिरचीचे रोप तयार केले जाते. त्यासाठी मागणी प्रमाणे रोपांवर औषध फवारणी केली जाते. यात वाढ होणे, वाढ खुंटने, टवटवीत राहणे अशा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र त्याचा फटका लागवड केलेल्या शेतकऱ्यांना बसतो. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना दोन- तीन तोड़नीनंतर झाडांना मिरच्या लागल्याच नाही, तर काही शेतकऱ्यांची मिरची बहरलीच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here