मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई दि.१३ : शिवसेना विधानसभेचे कै. आ. रमेश लटके यांचे अकस्मात दु:खद असे निधन झाले आहे. आज त्यांचे मी अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची विचारपूस देखील केली आहे. मी त्यांना शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहे. त्यांनी त्यांच्या कामाच्या कारकीर्दीत मतदारांसाठी जे न्याय देण्याच्या दृष्टीने काम केले होते ते काम त्यांच्या नंतरही शिवसेना पक्षाच्या वतीने विधीमंडळ आणि बाहेरही अविरत पणे सुरु राहील हीच त्यांना एका अर्थाने वेगळ्या स्वरूपाची आदरांजली असेल. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात स्वतः शिवसेनेची उपनेत्या आणि विधान परिषदेची उपसभापती या नात्याने सहभागी आहे.शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव जी ठाकरे हे देखील प्रत्येक शिवसैनिक आणि जनतेच्या सुख दु:खाच्या प्रसंगी स्वतः साहभागी होऊन धीर देत असतात. या कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगातून सावरण्याचे बळ ईश्वराने त्यांना देवो हीच प्रार्थना या निमित्ताने मी करीत आहे.