डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त

0

नाशिकरोड (प्रतिनिधी) कोरोना मुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाने त्रस्त करून सोडले आहे. मलेरिया, चिकनगुनिया सदृश्य संसर्गजन्य आजार फैलवण्याचा धोका संभवतो. तातडीने उपाययोजना करा, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिका प्रशासक श्री रमेश पवार यांना देण्यात आले.जुने प्रभाग क्र. १७ (नवीन प्रस्तावित प्र. क्र. २२) मध्ये डासांच्या अतिप्रमाणात प्रादुर्भावामुळे रात्री सुखाची झोप घेणे नागरिकांना मुश्किल होऊन बसले आहे. आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी डासांच्या वाढत्या फैलावाचे कारण ठरत आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने दुर्गंधी पसरून ईतर संसर्गजन्य आजार वाढण्याचा धोका संभवतो. तिरुपती नगर, शिवराम नगर, वैशाली नगर, आढाव नगर, श्रीराम नगर, अपूर्व कॉलनी, नारायण बापू नगर, दसक गावठाण, महालक्ष्मी नगर, ओम नगर, चांद्रेश्र्वर नगर, पिंटो कॉलनी, सिध्देश्वर नगर, हनुमंत नगर, रुक्मिणी नगर, पारिजात नगर, चैतन्य नगर, लोखंडे मळा हे संपूर्ण रहिवासी क्षेत्र डासांच्या वाढत्या कचाट्यात सापडले आहे. लहान मुलेमुली, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. डास प्रतिबंधक यंत्रणा अतिशय कुचकामी ठरत आहे. तातडीने यावर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मा. नगरसेवक श्री शैलेश ढगे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), बाळासाहेब जाधव, योगेश कपिले, गणेश बोराडे, संजय वरखेडे, स्वप्नील चाबुकस्वार, पंकज खेलुकर, विशाल पगारे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल खर्डे, नीलिमा घोडके, अमित कुलकर्णी, मिलिंद बर्वे, अरविंद भामरे, टी एस ढगे, प्रभाकर कदम, वी आर मोरे, प्रवीण शहाणे, संतोष मैंद, आर करंजकर, सुभाष अवचट, तानाजी पाटोळे, भीमराव भदाणे, राजेंद्र अहिरे, विद्या शिंदे, पंकज जाधव, कारभारी पगार, शशिकांत पुंड, संगीता गामणे, महेश पगारे, रोहित सूर्यवंशी, अजय शिरसाठ, सारंग गांगुर्डे, साहिल साळवे, सचिन शेलार, सचिन सोळसे, सनी साळवे आदींसह जवळपास १७५ ते २०० नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहे, प्रशासन लवकरच यावर ठोस निर्णय घेतील असे नागरिकांचे मत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here