भाजप हा मुंडे महाजनांचा पक्ष राहिला नसून तो आता चंपा-चमेलीचा पक्ष झाला आहे – अजित पाटील

0

अहमदनगर : (सुनिल नजन अहमदनगर) भाजप हा आता मुंडे -महाजनांचा पक्ष राहिला नसून तो आता चंपा-चमेलीचा पक्ष झाला आहे अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी केली. ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा जोडो संकल्प अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील विश्रामगृहात झालेल्या रासप कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलत होते.त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडनुका स्वबळावर लढवण्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील तेरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत चाचपणी केली.व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामांन्य जनते पर्यंत पोहोच झाली की नाही ते तपासून पाहिले. यावेळी त्यांच्या समवेत रासपचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शहाजी कोरडकर,आत्माराम कुंडकर, युवक रासपचे जिल्हा अध्यक्ष माउली जायभाये,पाथर्डी तालुका अध्यक्ष अंकुश बोके,उपाध्यक्ष अमोल दातीर, नवनाथ सोलाट,पप्पू लोखंडे, अक्षय दातीर, अतुल कटारनवरे,नाना पडळकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here