आपल्या संस्थानात राजर्षी शाहू महाराज कामगार हिताचे कार्य

0

मनमाड : प्रस्थापित सामाजव्यस्थेला छेद देऊन समतेचा पुरस्कार करणारे, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ.बी.सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,ओ.बी.सी.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.ज्या प्रमाणे युरोपातील त्या वेळी कामगारांना वाटत होते की जगातील कामगारांनी एक झाले पाहिजे त्या प्रमाणे राजर्षी शाहू महाराजांना वाटत होते की देशातील कामगारांनी एक झाले पाहिजे.त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी १९१७ मध्ये कामगारांसाठी संमेलने आयोजित केले.होते.आताच्या मान्यता प्राप्त कामगार संघटनाचा उद्य हा १९२५ते ३० दरम्यान आहे. पण राजर्षी शाहू महाराजांनी कामगार साठी आपले कार्य हे त्या आधी सुरू केले होते. आपल्या संस्थानात राजर्षी शाहू महाराज कामगार हिताचे कार्य केले आहे असे मत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.रतन निकम, पंढरीनाथ पठारे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत अढोकार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय काकडे, दिलिप बोरसे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कारखाना शाखा चे सहाय्यक संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, वरूण म्हसदे, संदिप अहिरे, अभ्युदय बागुल, प्रशांत मोरे, विनोद खरे, गौतम एळिंजे, गणपत गायकवाड, रविंद्र पगारे, विनोद झोडपे, किरण वाघ, अर्जुन बागुल, कल्याण धिवर, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे, विशाल त्रिभुवन,दिपक अस्वले,दिपक राऊत, आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here