राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी राहुल बागुल तसेच ठाणे जिल्हा महासचिव पदी आदर्श तायडे यांची निवड.

0

ठाणे ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कटारे* यांच्या आदेशानुसार, पक्षाचे महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिनभाऊ नांगरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोकण प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी झुंजार नेतृत्व, डॅशिंग, युवा उद्योजक राहुलभाऊ बागुल यांची व ठाणे जिल्हा महासचिवपदी पत्रकार आदर्श तायडे यांची निवड करण्यात आली. राहूल बागुल व आदर्श तायडे यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क असल्याकारणाने येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापुर्वी आपण आपल्या पक्षाची पक्कड ठाणे जिल्ह्यात मजबूत करून, आपल्या हक्काचा उमेदवार उभा करण्यात येईल व रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी अतिशय जोमात काम सुरू करून गाव तिथे शाखा निर्माण करण्याचे वचन नवोदित पदाधिकाऱ्यांनी दिले राहूल बागुल व आदर्श तायडे यांच्या ठाणे जिल्हावर निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वच ठिकाणावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.. याप्रसंगी त्यांच्या मातोश्री सौ.संगिता बागुल, पक्षाचे बदलापूर शहर, ग्रामीण अध्यक्ष कैलास जाधव, पत्रकार संघटनेचे सचिव भरत कारंडे आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here