
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा क्राईम रिपोर्टर) संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श माँडल म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनकडे पाहिले पाहिजे अशी अपेक्षा पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की आपन जेथे राहतो ती जागा आपण स्वच्छ ठेवतो.घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तसे पोलीस स्टेशन ही पोलीसासाठी एक घरच आहे. घराला घरपण येण्यासाठी आपण घरात चांगले वातावरण ठेवतो. घरात चांगली उर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसे पोलीस स्टेशनही एक घरच आहे. पाथर्डीचे पोलीस स्टेशन हे महाराष्ट्रातील सर्व पोलीसा साठी एक आदर्शवत रोडमाँडल बनावे व इतर पोलिसांनी प्रत्यक्ष भेट देऊन हा नमुना पहावा अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी व्यक्त केली.पाथर्डीचे पोलीसस्टेशन हे भंगार गाड्याचे माहेरघरच होते.परंतु आता पाथर्डीच्या पोलीस स्टेशनमध्ये येताच आपण एखाद्या मंदिरात तर आलो नाहीत ना असा भास सर्व सामान्य नागरिकांना होत आहे. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही किमया केली आहे.त्यांना सहायक पोलिस निरीक्षक सुरेश बाबर,कुमार कराड,लक्ष्मण पवार पोलीस नाईक निलेश म्हस्के, पोलीस हवालदार संजय बडे,ईश्वर गर्जे, प्रल्हाद पालवे,पो.हे.काँ. संजय काळे,अमोल कर्डीले, अनिल बडे,होमगार्ड रज्जाक शेख,विठ्ठल काकडे,लक्ष्मण खवले,फिरोज शेख,ईसाक शेख,सतिश फुलारी, भागवत खेडकर संजय धायतडक यांचे विषेश सहकार्य मिळत आहे.(स्पेशल क्राईम रिपोर्टर,सूनिल नजन, अहमदनगर जिल्हा)
