केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण परिषदेचे (सी.सी.एच.एफ.डब्लू ) चौदाव्या स्वास्थ्य चिंतन शिबिराला गुजरात येथे सुरुवात

0

गुजरात: टेंट सिटी (स्टॅच्यू ऑफ युनिटी) एकता नगर गुजरात येथे देशाचे आरोग्यमंत्री मा.ना.श्री.मनसुखभाई मांडवी जी, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मा.ना.डॉ.भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल तसेच देशभरातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या सी.सी.एच.एफ.डब्लू च्या चौदाव्या स्वास्थ्य चिंतन शिबिराला सुरुवात झाली. देशातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा ह्या बैठकीत घेण्यात येणार असून भारताच्या आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करता येतील आरोग्य विभागाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर ह्या चिंतन बैठकीत चर्चा होणार आहे. ह्या चिंतन शिबिराचे उदघाटन गुजरातचे मुख्यमंत्री मा.श्री.भुपेंद्र पटेल जी ह्यांनी केले तर मा.ना.श्री.मनसुखभाई मांडवी व मा.ना.डॉ.भारती पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल ह्यांनी उपस्थित गणमान्यवरांना संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here