संनियंत्रण कमिटीने मनाई उठविल्यामुळे आता तीन गिरण्यांसाठीची ३८९४ घरे गिरणी कामगारांना मिळणार

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.२९:मुंबईतील बॉम्बेडाईग कंपनीच्या स्प्रिंग मिल, टेक्सटाइल मिल आणि श्रीनिवास या तीन गिरण्यांमधील कामगारांना घरे देण्यावरील बंदी आज संनियंत्रण कमिटीचे चेअरमन ए.एस‌.अग्यार यांनी उठविल्यामुळे या गिरण्यांसाठी बांधून तयार असलेली सुमारे ३८९४ घरे कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१ मार्च २०२० रोजी वरील तीन मिलमधील कामगारांच्या घरांची सोडत म्हाडाने काढली होती.मात्र गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे हेमंत राऊळ, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी यांनी संनियंत्रण समिती पुढे खोटी माहिती दिल्यामुळे सदर घरे वाटपावर मनाई आली होती.त्यातून घरे मिळणे मुश्किल ठरुन, कामगारांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते.
या प्रश्नावर मुंबई महानगर पालिकेच्या कार्यालयात संनियंत्रण कमिटीने मिटिंग बोलावली होती.त्यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेचे नेते, तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते उपस्थित होते.निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण,मोहन पोळ,जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग,नंदू पारकर, हेमंत गोसावी यांनी कामगारांची वस्तूस्थिवर आधारित बाजू मांडली.ही बाजू ऐकून घेतल्यावर संनियंत्रण कमिटीचे चेअरमन ए.एस.अग्यार यांनी वरील प्रमाणे मनाई उठविली आहे.या प्रसंगी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणी स गोविंदराव मोहिते यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here