डॉ.भारतीताई पवार यांनी साधला अभोना ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांशी संवाद

0

नाशिक : कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती ताई प्रवीण पवार यांनी अभोना ग्रामीण रुग्णालयास आज अचानक भेट दिली.रुग्णालयातील स्वच्छता व रुग्ण व्यवस्था त्याच बरोबर रुग्णाना मिळणाऱ्या सेवेची चौकशी करून झाडाझडती घेतली.संबंधित वैदयकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत कडक सूचना केल्यात.रुग्णांचीआस्तेवाईक पणे चौकशी करत विचारपूस केली.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक खैरणार माजी जिल्हाध्यक्ष विकासकाका देशमुख,डॉ.भारतीताई पवार यांचे स्वीय सहायक डॉ.प्रशांत खैरे,कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार,अभोना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी वर्ग या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here