स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ७५ कोटी सूर्यनमस्कार उपक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

0

मनमाड : मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘७५ कोटी सूर्यनमस्कार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या देशभक्तांना वंदन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून केंद्र शासनाने देशभरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना ‘७५ कोटी सूर्यनमस्कार’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मनपा शाळा क्र. ७१ ने आॅनलाईन रजिस्ट्रेशन करत या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प व शपथ शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सतत २१ दिवस दररोज एकावेळी १३ सूर्यनमस्कार घातले.
मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी ‘७५ कोटी सूर्यनमस्कार’ उपक्रमाचे महत्त्व तसेच सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमाचे समन्वयक शिक्षक म्हणून विनोद मेणे यांनी काम पाहिले.उपक्रम कालावधी पूर्ण होताच शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना ई -प्रमाणपत्र प्राप्त झाले. या प्रमाणपत्रांचे वाटप आपली बांधिलकी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व भारतीय मानवाधिकार आयोगाच्या उत्तर महाराष्ट्राच्या जनरल सेक्रेटरी मा. उमाताई सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक शिक्षक विनोद मेणे तसेच किसन काळे, भगवान काकुळते, प्रविण गायकवाड, वंदना अरसुळे, प्रमिला देवरे, कविता वडघुले, शोभा मगर, सुवर्णा थोरात, रुपाली ठोक, शैलजा भागवत, योगिता खैरे, सुनंदा बच्छाव, प्रणिता ओतूरकर यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here