
(सुनिल नजन/अहमदनगर) किर्तना सारख्या धार्मिक कार्यक्रमात व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसाला पुढील जन्म हा बेडकाचा मिळतो असे उदगार प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांनी काढले ते कोपरे गावात हरिणाम सप्ताहाच्या सांगता समारंभात सेवा करताना बोलत होते. या सप्ताहात सर्व ह.भ.प.ज्ञानेश्वर बटुळे,अशोक कोंगे,सुरेश बांगर,महेश आव्हाड,सुर्यभान केसभट, भाउसाहेब भालसिंग, हरिश्चंद्र दगडखैर यांचीही किर्तने झाली. या सप्ताहात काकडा भजन,किर्तन, हरिपाठ,अभंग, गौळणी, भारुड, झिम्मा फुगडी, दिंडी प्रदक्षिणा अन्नदान ईत्यादी कार्यक्रम होउन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. हनुमान टाकळी, जवखेडे, वडुले,वाघोली, दिंडेवाडी परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)
