
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे ज्येष्ठ कार्यकर्ते विनोद झोडपे यांची कन्या कु दिक्षा हीने प्रोबेशनर ऑफिसर (सेंट्रल बैंक ऑफ इंडिया) या पदासाठी झालेल्या परिक्षेत सुयश संपादन केले..त्याबद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे झोडपे परिवाराच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, दिपक अस्वले कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप धिवर, राहुल शिंदे, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
