कान्होबाच्या मढीत,भटक्याच्या पंढरीत फुलरबाग यात्रा महोत्सव संपन्न

0

(सुनिल नजन/ अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्याची पंढरी म्हणून ओळखल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ यात्रा महोत्सव संपन्न झाला. कोरोणामुळे दोन वर्षे यात्रा महोत्सव बंद होता परंतु या वर्षी शासनाने काही अटीवर परवानगी दिली होती.ट्रस्ट तर्फे कानिफनाथ समाधी मंदिर गाभारा नाथभक्ता साठी खुला करून देण्यात आला होता.संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी नाथाच्या समाधिचे जवळ जाउन दर्शन घेतले. वाजत गाजत पैठणच्या गंगेच्या कावडीने समाधिला जलाभिषेक करण्यात आला. नाथाच्या मंदिरातून निघलेला नाथाच्या घोड्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.मानाच्या पाच गावातील कावडीचे निशान आणि नाथांचा गडावरील मिरवणुकीने वाजतगाजत आलेला घोडा हा दुर्मिळ क्षण पाहण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वांबोरी बीटचे नाथभक्त पोलीस हवालदार चंद्रकांत बर्हाटे यांनी नाथांचा घोडा डोक्यावर घेऊन शतपावली सेवा केली.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करून बीटचे पोलीस अधिकारी नवगीरे, बडे ,दळवी, शिकारे,म्हस्के, गुप्तचर यंत्रणेचे भगवान सानप आणि नेवासा तालुक्यातील तेलकुडगावच्या (पोलिसमीत्र संघटना) जनरक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदर्श साळवे,सचिव रेषमाताई चांडक,सुशांत गोरवे यांच्या तीस जनांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हिरामन बडे यांच्या लोकनाट्य मंडळाने भक्तांची चांगली करमणूक केली. ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड विश्वस्त रवींद्र आरोळे,डॉ. मढीकर यांच्या सह सर्व विश्वस्तांनी देवस्थानच्या वतीने योग्य नियोजन केले होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here