तिसगाव येथे विघ्न वरदनिधी आणि इंग्लिश स्कुलचा लोकार्पण सोहळा संपन्न

0

(सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे विघ्न वरद निधीआणि इंग्लिश स्कूलचा लोकार्पण सोहळा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.या कार्य क्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून २०११ सालातील मँगेसेस पुरस्कार आणि २०१३ सालातील पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या श्रीमती निलिमा मिश्रा या होत्या.तर अध्यक्ष स्थानी सोसायटीचे मा.चेरमन बाळासाहेब लवांडे हे होते.शिवसेनेचे मुंबई येथील नेते नंदकुमार मोरे,शेवगावचे अविनाश मगरे,अंकुश चितळे सागर राठोड, साहील पठाण आकाश पालवे,सुभाष बुधवंत,भास्कर गोरे, भगवान दराडे,विष्णूपंत पवार, नवनाथ चव्हाण, नवनाथ वाघ, शेखबाबा पुढारी,पुष्पा गर्जे, कोमल पवार,इलियास शेख,पंढरीनाथ आठरे,अरुण रायकर, ईत्यादी मांन्यवर उपस्थित होते. सर्व नियोजन इल्फाम शेख यांनी तर सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले.प्रास्ताविकातशिवसेनेचे नेते सुनिल पालवे म्हणाले की घरावर भगवा झेंडा लावणाऱ्या कुटुंबातील मुलांना देवराई-तिसगाव येथील स्कूलमध्ये मोफत शिक्षण देणार आणि परिसरातील दोनशे महिलांना रोजगारही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. हा उपक्रम स्व.एकनाथराव पालवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राबविण्यात येत आहे. पंचक्रोशीतील अनेक नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here