अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पेंन्शन घेणाऱ्या माजी आमदारात पिचड,कोल्हे,कर्डीले, तनपुरे, ढाकणे यांच्या नावाचा समावेश

0

(सुनिल नजन/अहमदनगर) अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पेंन्शन घेणाऱ्या माजी आमदारात (अकोले) विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा पहिला क्रमांक लागतो.त्यांना दरमहा १लाख १०हजार रुपये पेंन्शन मिळते.आता नुकतेच निधन झालेले (कोपरगाव) विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री कै.शंकरराव कोल्हे यांना (९४,०००) रुपये पेंन्शन मिळत होती. नगरतालुका विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना रुपये(९०,०००), राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना रुपये(८६,०००), पाथर्डीचे माजी आमदार बबनराव ढाकणे यांना रुपये(८०,०००), पारनेरचे विजय औटी यांना रुपये(७०,०००), शिर्डीचे अण्णा साहेब म्हस्के यांना रुपये((७०,०००), श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना रुपये(७०,०००), कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे यांना रुपये(६०,०००), राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना रुपये(६०,०००), शेवगावचे माजी आमदार नरेंद्र घुले यांना रुपये(६०,०००), पारनेर चे माजी आमदार नंदकुमार झावरे यांना रुपये(६०,०००), पाथर्डीचे माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांना रुपये(६०,०००), नेवाशाचे माजी आमदार संभाजी राव फाटके यांना रुपये(६०,०००), श्रीरामपूरचे माजी आमदार भाउसाहेब कांबळे यांना रुपये(५८,०००), कोपरगाव च्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांना रुपये(५०,०००), श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांना रुपये(५०,०००), नेवाशाचे माजी आमदार आणि आताचे नामदार विद्यमान मंत्री ना. शंकरराव गडाख यांना(५०,०००), नेवाशाचे दुसरे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना रुपये(५०,०००), नेवाशाचे तिसरे माजी आमदार पांडुरंग अभंग यांना रुपये(५०,०००), नेवाशाचे चौथे माजी आमदार तुकाराम गडाख यांना रुपये(५०,०००), नगर शहराचे माजी आमदार दादा कळमकर यांना रुपये(५०,०००), अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांना रुपये(५०,०००), आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर भाउ घुले यांना(५०,०००) रुपये याप्रमाणे माजी आमदार म्हणून निव्रुत्ती पेन्शन मिळत आहे ही माहिती दि.२८ आँक्टोबर २०२१ रोजी मंत्रालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे. यामध्ये जामखेड मतदार संघाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदारांना निव्रुत्ती पेंन्शनधारक म्हणून पेंन्शन मिळत आहे यामधील काही माजी आमदाराचे निधन झालेले आहे. नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी(300) आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यमान आमदार यांच्या विषयी गदारोळ निर्माण झाला आहे. माजी आमदारांची परिस्थिती लक्षात यावी म्हणून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here