एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२ पोषण पंधरवडा अंतर्गत मुरलीधरनगर येथे ॲनिमिया कॅम्प चे आयोजन

0

मनमाड :  मनमाड एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२ पोषण पंधरवडा अंतर्गत मुरलीधरनगर येथे अंगणवाडी क्र.६७,७८,७९,८०,८२ यांच्या सयुक्त नियोजनाने आणि ॲनिमिया प्रतिबंध व उपचार ह्या थीम नुसार उपजिल्हा रुग्णालय मनमाड आरोग्य विभागातील इंचार्ज वनिता पवार,मॅनेजर शुभम परदेशी,टेक्नीशियन रामु काळे यांच्या सयुक्त विद्यमानाने किशोरी /गरोदर महिला यांच्या साठी ॲनिमिया कॅम्प चे आयोजन करुन उपस्थित लाभार्थिची रक्त तपासणी करण्यात आली,व IFA टेबलेट वाटप करण्यात आल्या.यावेळी अंगणवाडी सेविका सायरा शाह,अलका सगळे,कविता कदम,रंजना चव्हाण,वंदना नारखेडे, मोहिनी इप्पर,संगीता काळे व पालकवर्ग उपस्थित होते,कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका अन्नपुर्णा अडसुळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here