१६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदीगर जिल्हा लातुर येथे २३ व २४एप्रिल २०२२ रोजी संपन्न

0

मनमाड : १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदीगर जिल्हा लातुर येथे २३ व २४एप्रिल २०२२ रोजी संपन्न होत आहे.या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवडीबद्दल व
जेष्ठ पत्रकार अशोक (आप्पा) परदेशी अमृत महोत्सव वर्षानिमित्त तसेच मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरीसिंह साळवे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दलभव्य सत्कार सोमवार दिनांक ०४ एप्रिल २०२२रोजी सायं.०६:३०वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मनमाड नगरपरिषद, मनमाड येथे करण्यात येणार आहे,या कार्यक्रमांचे अध्यक्ष बब्बुभाई शेख (जेष्ठ पत्रकार) हे असणार आहे.राजाभाऊ पगारे (मा..नगराध्यक्ष) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळ ची भुमिका किशोर ढमाले,( राज्य संघटक,विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे यावेळी मांडणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ.जे.वाय.इंगळे (जेष्ठ साहित्यिक)
सतिश केदारे (कामगार नेते) डॉ.नितीन जाधव (साहित्यिक) फिरोज शेख कॉ.रामदास पगारे हे उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन यशवंत बागुल, अमिन नबाब शेख, अर्जुन बागुल,राजू लहिरे, गुरू निकाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here