देवळा भावडबारी घाटात अपघात, एका कामगाराचा जागीच मृत्यू.

0

नाशिक : प्रशांत गिरासे देवळा
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील एस.के.डी. शाळेच्या समोर भावड बारी घाटात सोग्रासहुन ए. व्ही. बॉयलर कंपनीच्या पोल्ट्री फार्मच्या फिडच्या गोणी घेऊन देवळाच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक एम.एच.१८,ए.ए.०३९९ हा ट्रक पलटी झाल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रक भरधाव वेगाने असताना वळणावर हा अपघात झाला असून या अपघातामध्ये जितन भानु सहा वय वर्षे 40 हा बिहार राज्यातील मजूर होता. तो सदर तो खाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच देवळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, पोलीस नाईक निलेश सावकार, पोलीस मोरे हे सदर घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या मजुराचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here