मनमाड शहर शिवा संघटना आणि वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश तायडे यांना निवेदन

0

मनमाड : ( प्रतिनिधी – सागर भावसार ) बजाजनगर जिल्हा संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथील शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील क्रांतीसूर्य , जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या व एम.आय.डी.सी. च्या जागा हडप करणाऱ्या कैलास भोकरे व त्यांच्या साथीदारांवर मोका अंतर गुन्हा दाखल करुन त्याला हद्दपार करावे व एम.आय.डी.सी.च्या जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या एम.आय.डी.च्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करुन त्यांना निलंबित करण्या बाबत मनमाड शहर शिवा संघटना आणि वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश तायडे यांना निवेदन दिले.बाराव्या शतकातील समता नायक , महान क्रांतिकारक , आद्य लोकशाही संसदेचे जनक , समाजसुधाकर , क्रांतीसूर्य , जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना दिनांक ८ मार्च २०२२ रोजी शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर , बजाजनगर जिल्हा संभाजीनगर ( औरंगाबाद ) मध्ये घडली . आपल्या देशात आपण सर्वच महापुरुषांचा आदर करतो , बजाजनगर जिल्हा संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना करणारी घडलेली घटना ही आपल्या लोकशाही देशात अतिशय संतापजनक व सामाजिक लोकशाही आणि मानवतेला काळीमा लावणारी असून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कैलास भोकरे याला अटक त्याला मोका कायदा अंतर्गत कडक कारवाई करुन हद्दपार करावे व एम.आय.डी.सी. च्या खाली जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या एम.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांच्या कसुन चौकशी करुन त्यांना निलंबीत करावे . या घटनेचा जिल्हा शिवा संघटना , वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर प्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व गुन्हेगारांना कडक शासन करुन हद्दपार करण्याची मागणी करत आहोत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष कैलास वाडकर, ज्येष्ठ समाज बांधव गोविंद लिंगायत, नंदू गोंधळे ,विजय गोंधळे, नितीन गुळवे, शशीकांत हिंगमीरे, कृष्णा सुराडे, बाळासाहेब गोंधळे, दत्तात्रय तोडकर, शंकर चिनुके,संतोष चुनके,हर्षद कोरपे ,अशोक बिदरी ,सोनू चुनके ,कुणाल गोंधळे ,पंकज सुराडे, विजय तोडकर, करण वाडकर, मदन हिंगमिरे, रमेश गोंधळे, प्रशांत तक्ते, बाळु क्षीरसागर आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here