योग-निद्रा, मानसिक शांतीचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग

0

नाशिक : योग-निद्रा, मानसिक शांतीचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग.योग निद्रा किंवा योगिक झोप ही जागृत होणे आणि झोपणे यामधील चेतनेची अवस्था आहे. उपनिषद आणि महाभारतातही याचा उल्लेख आहे.आधुनिक विज्ञानानुसार, योग निद्रा ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये शरीर पूर्णपणे शिथिल होते आणि शाब्दिक सूचनांचे पालन करून साधक पद्धतशीरपणे आणि अधिकाधिक आंतरिक जगाविषयी जागरूक होतो. योग निद्रेमध्ये साधकाची ५ पैकी चार इंद्रिये ही सुप्तावस्थेत असतात, आणि केवळ श्रवण इंद्रिय कार्यरत असून दिलेल्या सूचनांशी जोडलेले असते.
यूएस आर्मी मध्ये सैनिकांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमधून बरे करण्यासाठी योग-निद्रेचा वापर केला जात आहे. २०१९ च्या रिसर्च नुसार, योग निद्रा ताण-तणाव कमी करू शकते. २०२२ च्या रिसर्च नुसार, ४५ पुरुष खेळाडूंच्या झोपेवर योग निद्रा फायदेशीर ठरलेली आहे.योग निद्रा… ही एक अशी क्रिया आहे, जी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण करू शकतात.हा योग निद्रेचा सराव आठवड्यातून कमीत कमी एकदा आणि जेव्हा आवश्यक असेल, (म्हणजे झोपेचा अभाव, विश्रांतीचा अभाव आणि तणाव असेल) तेंव्हा केला पाहिजे.हे शरीर निरोगी आणि मन शांत आणि आनंदी ठेवण्यास मदत करते.

लिंक इथे आहे 👇👇👇

डॉ सुरेश सुर्यवंशी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here