दीर-भावजयीच्या निधनाने जवखेडे गावावर शोककळा ?

0

(सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) श्रीमती तान्हाबाई सखाराम मतकर यांचे वयाच्या १११ व्या वर्षी आणि भारतीय सैनिक मेजर रंगनाथ धोंडीबा मतकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी एकाच दिवशी दुखःद निधन ! अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील श्रीमती तान्हाबाई सखाराम मतकर यांचे वयाच्या १११ व्या वर्षी दुखःद निधन झाले. त्यांच्या मागे तिन मुले आणि चार मुली , चार सुना,२५ नातवंडे असा परिवार आहे.अहमदनगर जिल्हा क्राईम रिपोर्टर ,पत्रकार सुनिल नजन यांच्या त्या आजीबाई होत्या. त्यांच्या अंत्यविधी साठी धार्मिक, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील अनेक मांन्यवर उपस्थित होते. तसेच माजी सैनिक असलेले मेजर रंगनाथ धोंडीबा मतकर (वय७३) यांचेही अहमदनगर येथे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले आणि दोन विवाहित मुली सुना नातवंडे असा परीवार आहे.प्रा.रमेश मतकर यांचे ते वडील होते. मेजर रंगनाथ मतकर आणि तान्हाबाई मतकर यांचे दीर-भावजयीचे नाते होते. दीर -भावजयीच्या एकाच दिवशी झालेल्या निधनामुळे मतकर परीवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.दीर-भावजयीच्या एकाच दिवशी वैकुंठ गमनाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दोन्ही अंत्यविधी एकाच वेळी असल्याने स्मशानभूमीत जनसागर उसळून यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.अंत्यविधीच्या अगोदर जवखेडे गावातील सर्व व्यावसायिकांनी गावातील माजी सैनिकाच्या निधनानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून कोणत्याही प्रकारचा दुखवटा न पाळता आपले दुकानातील व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवून गावात बेशिस्त पणाचे वर्तन करून मतकर परिवारातील दुखितांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत. दुखितांच्या नातेवाईकांनी या गैरवर्तना बद्दल जाहीर खेद व्यक्त केला आहे.मेजर रंगनाथ मतकर हे देशाची सेवा केलेले भारतीय माजी सैनिक होते ही गावाच्या द्रुष्टीने अभिमानाची बाब होती.पण तमाम जवखेडे गावातील व्यावसायिक दुकान मालकांना त्यांचे काहीही सोयरसुतक नसल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. अगोदरच एका घटनेने बदनाम झालेल्या या गावातील लोक स्वतःला सुधारलेले,पुढारलेले,लोकहितवादी समजतात पण प्रत्यक्षात मात्र देशाची सेवा केलेल्या माजी सैनिका विषयी कोणत्याही प्रकारचा आदर आणि काहीही आस्था नसल्याचे दिसून येते. प्रतिनिधी/सुनिल नजन अहमदनगर जिल्हा क्राईम रिपोर्टर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here