सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या अथक प्रयासाने विम्याचे 374 कोटी मंजूर

0

पनवेलः शेकाप नेते, माजी आ. विवेक पाटील आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे साथीदार आणि नव्या पदाधिकार्‍यांच्या कपट कारस्थानाने 512 कोटीला बुडित काढलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेविरूद्ध सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू आणि पनवेल संघर्ष समितीने पुकारलेल्या लढ्याला घवघवित यश आल्याचे खात्रिशिर वृत्त हाती आले आहे. विमा कंपनीने 374 कोटी रूपये मंजूर केल्याने खातेदार, ठेविदारांचे ग्रहण सुटले आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसात विमा कंपनीकडून अधिकृत घोषणा केली जाईल. तर पुढच्या 15 दिवसात पैसे वाटप करण्याच्या प्रक्रियेसाठी कांतीलाल कडू बँकेच्या अवसायकांकड़े आग्रही राहिले आहेत.
कांतीलाल कडू यांनीच लावले भ्रष्टाचाराला सुरूंग शेकापचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांनी त्यांच्या साथीदारांसह कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे 512 कोटीचे उखळ पांढरे केले आहे. त्याविरूद्ध पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरत केलला पत्रव्यवहार, अधिकारी, शासनातील मंत्री, केंद्र सरकारचे अर्थ खाते आणि विशेष म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांच्याशी पत्रव्यवहार करून कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराला सुरूंग लावले होते. त्याशिवाय कडू यांनी मोठ्या धाडसाने माजी आमदार विवेक पाटील यांना सक्त संचनालयाकडे (ईडी) तक्रार करून अटकेचे केलेले प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळेचे आजही पाटील तळोजे कारागृहात आहेत.
राज्य सरकारने लावला ‘ठाकूर-बालदीं’ना चुना
———–
राज्य सरकारने अद्यापही पोलिसात दाखल केलेल्या 85 आरोपींविरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि त्यांचे ‘कंबरमोडे गुरू’ किरीट सोमय्या यांनी आकाश पाताळ एक करूनही अद्याप राज्य सरकारने कुणावरही कारवाई केली नाही. दोन्ही आमदारांनी तर तीन वेळा अधिवेशानात प्रश्‍न उपस्थित करूनही त्यांना राज्य सरकारने चुना लावल्याने त्यांनी पनवेल संघर्ष समितीच्या मागणीवरून ईडीने केलेल्या कामगिरीचे श्रेय लाटण्याचा वांझोटा प्रयत्न केला आहे.
तेव्हा आ. प्रशांत ठाकूर कांतीलाल कडूंवर ‘सुपारी’
घेतल्याचे पत्रकार परिषदेत आरोप करत होते…
————
कांतीलाल कडू यांनी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासाठी कंबर कसली होती. तेव्हा आमदार प्रशांत ठाकूर हे कांतीलाल कडू यांच्यावर विवेक पाटलांची ‘सुपारी’ घेतल्याचे पत्रकार परिषदेत बेंबींच्या देठापासून ओरडत होते. विम्याचे पैसे कसे मिरणार? असा खोचक सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता विमा इन्शुरन्स कॉर्पोरेशन गँरटी कंपनीने 374 कोटीचा विमा मंजूर केल्याने सणसणीत चपराक बसणार आहे.
384 कोटीचा बँकेने पाठविला होता प्रस्ताव
—————-
कांतीलाल कडू आणि पनवेल संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्नाळा बँकेने विमा इन्शुरन्स कंपनीकडे 384 कोटीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैेंकी 374 कोटीच्या रक्कमेला मंजूरी दिल्याचे खास वृत्त हाती आले आहे. विमा इन्शुरन्स कंपनीचे मुख्य जनरल मॅनेजर व्यंकटा चलपती यांची साक्षरीही 374 कोटीच्या प्रस्तावावर झाली आहे. उद्या किंवा परवा ते पत्र बँकेचे अवसायक हांडे यांना प्राप्त होण्याची शक्यता आहे.
35 हजार ठेविदारांचे केवायसी अर्ज दाखल
————–
कर्नाळा बँकेने 35 हजार ठेविदारांचे केवायसी अर्ज दाखल करून घेतले होते. एकूण 50,689 ठेविदारांपैंकी 35 हजार ठेविदारांनी बँकेत विमा रक्कम परत मिळावी, म्हणून अर्ज केले होते. त्याची पडताळणी आणि ऑडिट करून विमा कंपनीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार 374 कोटी रूपयांचा विमा मंजूर झाल्याची माहिती कडू यांच्या हाती आली आहे.
15 दिवसात प्रत्यक्षात होणार पैसे वाटपाला सुरूवात
—————
कांतीलाल कडू यांनी सहकार खाते आणि विमा इन्शुरन्स कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला अखंड यश आले आहे. यापुढे येत्या पंधरा दिवसात बँक काही नियम व अटी घालून ठेविदारांकडून अर्ज भरून घेणार आहे. त्यानुसार ठेविदारांना प्रत्यक्षात पैसे मिळतील. येत्या दोन महिन्याच्या आत सर्व ठेविदारांना 374 कोटी रूपयांचे वाटप होणार असल्याने कांतीलाल कडू आणि त्यांच्या लढ्यातील सहकार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शेकाप नाकाने कांदे लागला सोळू!
—————
शेकापच्या नेत्यांनी बँकेत 512 कोटीचा भ्रष्टाचार केल्यानंतर आणि त्यांचे नेते गेल्या सात महिन्यापासून तळोजे कारागृहात असतानाही नाकाने कांदे सोळत आता 374 कोटी विम्याच्या रक्कमेचे श्रेय लाटण्यासाठी सरसावले आहेत. त्याऐवजी त्यांनी आता 85 आरोपींच्या अटकेसाठी आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी आंदोलन केले असते तर शेकापची नैतिकता जीवंत राहिली असती असा टोला ठेविदार लगावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here