(अहमदनगर प्रतिनिधी) जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले-कोपरे सिमेवर असलेल्या दातीरवस्ती येथे वैकुंठवासी सदगुरु यादवबाबा वाघोलीकर, बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशिर्वादाने ह.भ.प.हरीभाऊ महाराज भोंदे व ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा पाटबंधारेच्या मायनर क्र.८ वरील दातीरवस्ती वरील हनुमान मंदिरात दि.८ ते१५ फेब्रुवारी २०२२ या काळात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरील काळात ह.भ.प.तुकाराम महाराज केसभट,अभिमंन्यु महाराज भालसिंग,माधव महाराज कोरे,महेंद्र महाराज जाधव,रामभाऊ महाराज पेहरे,बाळासाहेब भालके,कारभारी झरेकर यांची किर्तने होणार आहेत.दि.१४फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ते६ या वेळेत ग्रंथ दिंडी मिरवणूक होणार आहे.दि.१५ फेब्रुवारी२०२२ रोजी ह.भ.प.दत्तात्रय महाराज जगताप यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.व्यासपीठ ह.भ.प.बाबासाहेब महाराज मतकर हे चालवणार आहेत तर म्रुदंगाचार्य म्हणून उद्धव वाघमारे, आणि गायनाचार्य म्हणून दिलिप गायकवाड व नवनाथ गोरे हे सेवा देणार आहेत.पहाटेचे काकडा भजन बाळक्रुष्ण साठे महाराज करणार आहेत. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दातीरवस्ती वरील ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)