महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न.

0

मुंबई : मुंबई सेंट्रल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) मुंबई , दि- ३ मुंबई सेंट्रल येथे बी.आय.टी चाळ परीसरात असलेल्या गेली ८६ वर्षे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर गावडे , प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र नरवणकर , समाजसेवक दिपक अंकलेश्वरीया , जगदिश सोळंकी , सिनेदिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे , ज्येष्ठ पत्रकार शिवदास शिरोडकर , पत्रकार मिलिंद आरोलकर, माजी नगरसेवक अरविंद बने उपस्थित होते . राजेंद्र लकेश्री यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या ८६ वर्षाच्या कारकीर्दीचा थोडक्यात परीचय उपस्थितांना करवून दिला .उपस्थित मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यांचे मार्गदर्शन उपस्थित तरुण वर्गाला लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सरचिटणीस महादेव लेपकर तसेच सुरेश जाधव , नथुराम खोत , सुरेश कणसे आदींनी परीश्रम घेतले .धन्यवाद महेश्वर तेटांबे पत्रकार ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here