राजकारण नव्हे अस्सल समाजसेवक

0

मनमाड : राजकारणी नव्हे तर अस्सल समाजसेवक असलेले नगरसेवक मिलींद उबाळे प्रभाग क्र . 5 चंदनवाडी येथील लोकप्रिय काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक मिलींद उबाळे यांनी प्रभागामध्ये विकासाची गंगा आणून प्रभाग सुजलाम सुफलाम केला आहे . येथील नागरीकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सतत प्रयत्नशील राहून वार्डात सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे वार्डात चांगल्या प्रकारे विकास घडून आणला आहे . समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . दोन्ही अंग एकमेकांशिवाय अधुरे आहेत . मिलींदभाऊ जरी राजकारणात असले तरी त्यांचा मुळ पिंड हा समाजसेवकाचाच आहे . कारण त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून प्रगती केली आहे . त्यामुळे त्यांनी माणुसकीला कधीली तिलांजली दिली नाही . मिलींदभाऊ यांच्या मनात राजकारणात जाण्याचे कधीही नव्हते परंतु योगायोगाने त्यांनी यात प्रवेश केला आणि यशस्वीही झाले . आज वार्डात त्यांचे नाव आदराने घेतले जाते . विकासाबरोबर येथील बहुतांश सुशिक्षीत बेरोजगार व इतर तरुणांना त्यांनी भारतीय खाद्य निगम मध्ये ठेकेदार पध्दतीत कामावर घेण्यास ठेकेदाराला भाग पाडले . भुमीपुत्राला न्याय द्यावा ही ठाम भूमिका मिलिंदभाऊंनी मांडून स्थानिक तरुणांना भारतीय खाद्य निगम मध्ये ठेकेदारी पध्दीत सामावून घेण्यास भाग पाडले त्यामुळे सुमारे 200 ते 250 तरुणांना रोजगार मिळून त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत उभा करून दिला त्यामुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात समाधानी व आनंदी आहे केवळ मिलींदभाऊ मुळेच . कोरोना काळातही अनेकांना मदतीचा हात देऊन त्यांना संकटसमयी मदत केली आहे . याबरोबरच जयंती उत्सव आदि कार्यक्रमामध्येही स्वयंस्फुर्तीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखविले आहेत . मिलींदभाऊंनी व्देशाऐवजी विकासाचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे मोठेपण यातून दिसून येते . नेहमी स्मितहास्य करीत नागरीकांच्या मदतीला धावून येणारे मिलींदभाऊ त्यांच्या रूपाने वार्डाला एक चांगला मनमिळावू लोकप्रतिनिधी मिळाल्याची भावना नागरीकांतून व्यक्त केली जात आहे .( संकलन -नाना खरे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here