अ. भा. म. चित्रपट निर्माता महामंडळ आयोजीत पाहिले मराठी चित्रपट संमेलन रंगणार कोल्हापूर नगरीत.

0

मुंबई : दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
आखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन, कोल्हापूर येथे २७,२८ एप्रिल २०२२,रोजी राज्यस्तरिय संमेलनाच्या नियोजन संदर्भात आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या कार्यकारणीची बैठक शुक्रवार दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी हाॅटेल एवन रुबी, दादर येथे पार पडली. बैठकीच्या सु्रुवातीला ज्येष्ठ निर्माते,अभिनेते कै.रमेश देव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. सदर बैठकी मध्ये चित्रपट संमेलनात चित्रपटसृष्टीमध्ये काम करणार्‍या चित्रकर्मींना अनुक्रमे चित्रश्री, चित्रभूषण, चित्ररत्न व चित्रमहारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यांत आला. त्याकरीता पुरस्कार निवड समिती मार्फत पुरस्कार्थ्यांची निवड केली जाईल.तसेच चित्रपट संमेलनाची घोषणा कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत लवकरचं करण्यांत येईल. सदर बैठकीचे अध्यक्ष स्थान निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी भूषविले. बैठकीमध्ये मुरलीधर दिक्षीत (संस्थापक, संचालक), प्रशांत नांदगावकर (उपाध्यक्ष), शरदचंद्र जाधव (सरचिटणीस), मनिष व्हटकर (खजिनदार), महेश्वर तेटांबे (संचालक), किशोर केदार (संचालक), रुपेश शिरोळे (कार्यालयीन व्यवस्थापक), रमेश साळवे, सदस्य आदि मंडळी उपस्थित होती.( धन्यवाद,महेश्वर तेटांबे,संचालकब(अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here