कॉलनी फोरमच्या कार्यालयाची निर्मिती

0

मुंबई : सिडको महामंडळाच्या हद्दीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या विविध शहरांची निर्मिती करण्यात आलेली आहे.भारताच्या विविध राज्यांमधून तसेच महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यांमधून काम धंदा नोकरी करता, महामुंबईमध्ये आलेले लोक या विविध शहरांमध्ये राहतात.सदरच्या नागरिक, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको व महानगरपालिकेचे विविध प्रकारचे कर भरत असतात. परंतु शासनाचे कर भरत असताना, त्याबदल्यात कॉलनीमधील नागरिकांना सेवा सुविधा मिळत नाहीत.शहरांच्या विकास प्रलंबित राहतो, यासाठी सिडको कॉलनी याचे प्रश्न, शासन-प्रशासनाकडे मांडण्यासाठी आणि या शहरांचा आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 2013 ला कॉलनी फोरमच्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. यापूर्वी कॉलनी फोरमच्या दोन कार्यालय कार्यरत होती. परंतु मागील दोन वर्षापासून कॉलनी फोरमच्या कार्यक्षेत्र खारघर हे न राहता , कामोठा कळंबोली तळोजा नवीन पनवेल खांदा कॉलनी असे वाढत असल्याने, नागरिकांचे विविध प्रश्न त्याच्या स्थानिक पातळीवरील कार्यालयात सोडविले जावेत यासाठी , कॉलनी फोरमच्या समन्वयका कडून नवीन कार्यालय स्थापन करणे बाबत विनंती करण्यात होती.त्याचाच एक भाग म्हणून 23 जानेवारी रोजी खारघर सेक्टर 11 येथे आणि सेक्टर 12 येथे नव्याने 2 कॉलनी फोरमच्या कार्यालय सुरू करण्यात आलेली आहेत. सदर वेळी शेकडोंच्या संख्येने समन्वयक हजर होते. सदरच्या कार्यालयामध्ये सौ अनिता बाबासाहेब भोसले या समन्वयक म्हणून कार्य करणार आहेत.यापुढील काळात खारघरमध्ये आणखी किमान 4 कार्यालय तसेच कामोठा कळंबोली खांदा कॉलनी तळोजा येथे कॉलनी फोरमची कार्यालय समन्वयकाच्या मागणीनुसार निर्माण करण्यात येणार आहे. जेणेकरून ज्या त्या ठिकाणच्या नोड मधील आणि सेक्टर मधील रहिवाशांना, त्यांचे प्रश्न कॉलनी फोरमच्या मंचावर मांडता येतील आणि कॉलनी विभागाचा सर्वांगीण विकास होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here