राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून राज्यातील तमाशा कलावंतांना १ कोटी रुपयांची मदत.

0

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तमाशा कार्यक्रमांवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे तमाशातील कलाकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. आर्थिक संकटातून जात असलेल्या तमाशा फडमालकांनी पॅकेज जाहीर करण्याची मागणी शनिवारी पत्रकार परिषदेत केली होती. हे सर्व तमाशा कलाकार व फडमालक आंदोलनाच्या तयारीत होते. या पत्रकार परिषदेत मी स्वतः त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व दिलीपराव वळसे पाटील साहेबांकडे* जाऊन यासंदर्भात चर्चा करू व यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सकाळी या सर्व तमाशा फडमालकांना घेऊन मुंबई येथे शरद पवार साहेबांशी चर्चा केली. यावेळी साहेबांनी कलावंतांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून राज्यातील तमाशा कलाकारांना १ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. त्यांनंतर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व ना.दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या समवेत तमाशा कार्यक्रमांवर असलेल्या बंदी संदर्भात चर्चा केली. येत्या १ फेब्रुवारी पासून ५०% प्रेक्षक उपस्थितीत राज्यात तमाशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येईल असे अजितदादांनी यावेळी सांगितले. या चर्चेनंतर जेष्ठ कलावंत व तमाशा फडमालक रघुवीर खेडकर आणि मंगलाताई बनसोडे यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.तमाशा हि महाराष्ट्राची पारंपारिक लोककला आहे. या लोककलेचा ठेवा जपण्यासाठी राज्यातील तमाशा कलावंतांच्या मागे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे अशी माझी भावना आहे.या बैठकीला जेष्ठ कलावंत व फड मालक रघुवीर खेडकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगलाताई बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मोहित नारायणगावकर, अविष्कार मुळे, मुसाभाई इनामदार आदी प्रतिनिधी उपस्थित होते.(अतुल_वल्लभशेठ_बेनके,जुन्नर आम्ही- जुन्नरकर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here