भगवानबाबा यांची पिरेवाडीच्या भैरवनाथ गडावर पंचाहत्तरी साजरी करणार – महंत रामकृष्ण शास्त्री

0

(अहमदनगर प्रतिनिधी) संत भगवानबाबा हे भैरवनाथ गडावर आले होते त्याला २०२९ साली पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतात म्हणून महाराष्ट्रातील पंचाहत्तर संत भैरवनाथ गडावर आणून महायज्ञ करण्याचे प्रस्तावित असुन त्या साठी भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे.असे विठ्ठल गडाचे महंत रामक्रुष्ण शास्त्री यांनी सांगितले ते भैरवनाथ मंदिरात हरिणाम सोहळ्यातील काल्याच्या किर्तनाप्रसंगी बोलत होते. यावेळी केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे हेही आवर्जून उपस्थित होते. त्यांनी दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताहातील महाप्रसादासाठी केदारेश्वर कारखान्या तर्फे साखरेचे एक पोते देण्याचे याप्रसंगी जाहीर केले. भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोध्दाराचा नारळ पिरेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here