कांदा उत्पादकांनो.. अतीउत्तमच्या नादात उत्पादन खर्च वाढवू नका.

0

पुणे : 🅿️🅿️✍️ यावर्षी रब्बी हंगामात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विक्रमी कांदा लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण देशात ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. त्यामुळे देशात यावर्षी कांदा लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चालू हंगामात भविष्यात कांद्याचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकंदरीत पहाता कांदा उत्पादक शेतकर्यांनी चालू वर्षी उत्पादन खर्चात बचत करणे म्हत्वाचे ठरणार आहे. उत्पादन खर्चात बचत हाच नफा अशी सध्याची परिस्थिती आहे. कांद्याचे उत्पादन घेताना भावनेच्या आहारी न जाता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन उत्पादन खर्चात बचत करणे म्हत्वाचे ठरणार आहे. कांदा लागवड जवळपास उरकलेली आहे. आता खते व औषधे कंपन्यांचा मार्केटींगचा नवनवीन फंडा खेडोपड्यातून चालू झाला आहे. यापासून सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तसेच हवामानखात्याचा अंदाजानुसार यावर्षी नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
अज्ञानापोटी भावनेच्या आहारी न जाता तुमच्या घामाची अतिरिक्त लूट होवु देऊ नका. घामाच्या थेंबाबरोबर नशीब बदलायलाही विधात्याने शेतकर्यांना हे कपाळ दिलंय. ते उजळायचेही आहे, शेवटपर्यंत फक्त घामाने काळं ठेवायचे नाही.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष मा. भारत दिघोळे साहेब*,व त्यांचे सर्व पदाधिकारी, सहकारी वेळोवेळी कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी स्थानिक आणि शासकीय पातळीवर कांदा उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. तरी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. 🏵️ प्रमोद पानसरे, पत्रकार, ओतूर
🏵️ पुणे जिल्हा अध्यक्ष,महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here