अ.भा.म.चि.निर्माता महामंडळाची नवनियुक्त संचालक मंडळाची सभा अेवन रुबी हॉटेल, दादर पूर्व येथे संपन्न.

0

मुंबई : आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची नवनियुक्त संचालक मंडळाची सभा शनिवार दि.२२ जानेवारी २०२२ रोजी हाॅटेल अेवन रुबी, दादर पूर्व येथे संपन्न झाली. सर्वप्रथम अध्यक्ष मोरे यांनी सर्व उपस्थित नवनियुक्त संचालकांचे स्वागत केले. तद्प्रसंगी उपस्थितीत कार्यकारणी मधील सदस्य पुढिलप्रमाणे श्री.देवेंद्र मोरे (संस्थापक अध्यक्ष), श्री.प्रशांत नांदगावकर, (उपाध्यक्ष), श्री.विकास पाटिल (उपाध्यक्ष), श्री.शरदचंद्र जाधव (महासचिव), श्री.मनिष व्हटकर (खजिनदार), श्री.विजय शिंदे (पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख), श्री.महेश्वर तेटांबे (संचालक), श्री.किशोर केदार (संचालक) अँड.मनिष व्हटकर (संचालक) तसेच कार्यालयीन प्रमुख श्री.रुपेश शिरोळे. सदर बैठकीत निर्मात्यांच्या समस्यांविषयी साधकबाधक चर्चा करण्यांत आली व त्या सोडविण्याकरीता कालबध कार्यक्रम आखण्यात आला.त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात मुंबई मध्ये चित्रपट महोत्सव आणि एप्रिल महिन्यात कोल्हापूर मध्ये मराठी चित्रपट निर्माता संमेलन घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यांत आले. सभेच्या शेवटी अध्यक्ष मोरे यांनी सर्व नवनियुक्त संचालकांचे आभार मानले. अशा प्रकारे अ.भा.म.चि.निर्माता महामंडळाची नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली वाहिली सभा खेळीमेळीत संपन्न झाली.धन्यवाद,महेश्वर तेटांबे (संचालक, पत्रकार)
अ.भा.म.चि.निर्माता महामंडळ,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here