जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न.

0

मुंबई :  डिसेंबर २०२१ रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने मुंबई मधील लोअर परेल येथील यशवंत भुवन मध्ये जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न झाले. मुंबईमधील सर्व भागांमधून दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असलेले बंधु- भगीनी, पालक व सामाजिक कार्यकर्ते या शिबीरास उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जनकल्याण समितीचे कोंकण संभाग सहकार्यवाह श्री. सुहासजी जोशी यांनी जनकल्याण समितीचे कार्य विषद केले. मान्यवरांचा परिचय व स्वागत श्री. रविंद्रजी रांगणेकर यांनी केले. लातूर येथील संवेदना प्रकल्प राष्ट्रीय न्यास अधिनियमांतर्गत स्टेट नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. श्री. व्यंकट लामजणे विशेष शिक्षक तथा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितांना दिव्यांगांचे प्रकार, वैश्विक कार्ड (यु डी आय डी), निरामय आरोग्य विमा योजना,बस, रेल्वे पास योजना, दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी, संजय गांधी निराधार योजना, कायदेशीर पालकत्व आदी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जाता जाता नेत्रदान, जगता जगता रक्तदान याची जनजागृती व्हावी. आपल्या जीवनात एक तरी दिव्यांग व्यक्ती आपला मित्र असला पाहिजे.दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा एक अभिन्न भाग आहे.दिव्यांग व्यक्ती ची समस्या ही त्याची समस्या नसून संपूर्ण समाजाची ही समस्या आहे. समाजातील हा वंचित घटक आहे. त्यांना केवळ सहानुभूती नको. त्यांच्या गरजेनुसार आपण सहाय्यभूत झाले पाहिजे. नियतीने म्हणा किंवा अपघाताने म्हणा दिव्यांग व्यक्तीवर ही वेळ आली आहे. अशा वेळी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हटल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. दिव्यांगांच्या जीवनात आनंद मिळवून देण्यासाठी आपण सहाय्यभुत होऊ शकतोत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जनकल्याण समितीचे महानगर कार्यवाह श्री. अंकुशजी बेटकर यांनी दिव्यांगांचे हे कार्य सर्वांनी मिळून करावयाचे आहे. मुबंईच्या प्रत्येक नगरामध्ये दिव्यांग सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात येईल असे सांगीतले. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र होनमाने यांनी केले तर आभार श्री. अरुणजी घोलप यांनी मानले. श्री. संजयजी मेहरा यांच्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास दिव्यांग व्यक्ती, पालक यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here