सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-004

0

मुंबई ( जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७) विषय:आमचे रजिस्टर्ड सोसायटी आहे व बिल्डरने एक वेळ देखभाल निधी गोळा केलेला आहे व त्यातून देखभालीचा खर्च करतो. सोसायटी होण्याआधी बिल्डरने इमारतीच्या गच्चीवर एक मोबाईल टॉवर बसवला आहे व त्याचे भाडे स्वतः बिल्डर घेतो. त्याविषयी चौकशी केल्यास बिल्डर असे म्हणाला, की गच्ची तुम्हाला विकली नाही, त्याचा मालक मीच आहे. तरी सदरच्या टाॅवरचे भाडे सोसायटीला मिळू शकेल काय?

उत्तर: बिल्डरने मंजूर नकाशामध्ये गच्ची ही सार्वजनिक मालमत्तेत दाखवली असेल, तर गच्चीच्या मालकीबाबत बिल्डरला अधिकार सांगता येणार नाही. वास्तविक सोसायटी स्थापन केल्यानंतर बिल्डरने ती एक वेळ देखभाल निधीसह सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली पाहिजे व सोसायटीच्या नावे खरेदीखत करून दिले पाहिजे. तसे न केल्यास आपणास बिल्डरविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल.लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे सो.
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माे.7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत,
सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.श्री जगदीश काशीकर हे ही अशा अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here