देवळा तालुका मराठी पत्रकार संघाची सन निवडणूक बिनविरोध.

0

( तालुकाध्यक्षपदी “आपलं महानगर” चे वैभव पवार तर सरचिटणीसपदी “दिव्यमराठी”चे जगदीश निकम..!
प्रशांत गिरासे नाशिक )देवळा दि.२७-
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित देवळा तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२२~२४ या वर्षांची द्विवार्षिक निवडणूक नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.देवळा तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह देवळा येथे आज (दि.२७) पार पडली.यावेळी जिल्हा समन्वयक बाजीराव खैरनार उपस्थित होते. यशवंत पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.एकूण १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.नविन कार्यकारिणी अशी.तालुकाध्यक्ष वैभवपवार,कार्याध्यक्ष विशाल पाटील,उपाध्यक्ष भगवान देवरे,दादाजी हिरे व महादेव मोरे,सरचिटणीस जगदीश निकम,सहसरचिटणीस कुणाल शिरसाठ ,खजिनदार सुभाष चव्हाण,सहखजिनदार आदिनाथ सूर्यवंशी,संघटक प्रविण आहेर,सहसंघटक सुभाषबिरारी,समन्वयक संदीप देवरे,
कार्यकारिणी सदस्य एकनाथ सावळा,निलेशजाधव, सोपान सोनवणे,मनोज वैद्य,विष्णू जाधव,सौ.संगीता पगार-रौंदळ आदी.नवनिर्वाचित पदाधिकारींचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वैभव पवार,विद्यमान तालुकाध्यक्ष विशाल मराठे,विनोद पटणी,विशाल पाटील,एकनाथ सावळा,वसंत रौंदळ यांनी पत्रकार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.आदिनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले.निवडणूकी प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे सर्व सभासद उपस्थिती होते. नवनिर्वाचित पदाधिकारींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here