सवाई गंधर्व महोत्सवास सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई : ( जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप ९७६८४२५७५७ )

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याची शान असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवास शासनाने आज परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.या महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी आज चंद्रकांतदादांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी भाजप चे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.या भेटीत सवाई गंधर्व महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटावर मात करत आता जनजीवन पूर्वपदावर येते आहे, अश्या परिस्थितीत सवाई गंधर्व महोत्सवाची सांस्कृतिक मेजवानी रसिकांसाठी पर्वणीच ठरेल असेही ते म्हणाले.तसेच प्रशासनानेही महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असेही आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here